कोल्हापुरात विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी प्राध्यापकास अटक
कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.)। सरनोबतवाडी परिसरातील एका इंजिनियरिंग महाविद्यालयात प्राध्यापकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन अन् मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत गैरवर्तन केले. या विनयभंग केल्याच्या संताजनक घटनेबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात
विनायभंग करणारा प्रा. सौरभ जोशी


कोल्हापूर, 07 मार्च (हिं.स.)। सरनोबतवाडी परिसरातील एका इंजिनियरिंग महाविद्यालयात प्राध्यापकाने विद्यार्थिनीला वारंवार फोन अन् मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेत गैरवर्तन केले. या विनयभंग केल्याच्या संताजनक घटनेबाबत गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राध्यापक सौरभ जोशी (रा. स्मृती अपार्टमेंट, कोल्हापूर) याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी शिक्षणासाठी कोल्हापुरात वास्तव्यास आहे. आरोपी सौरभ जोशी याने नोव्हेंबर २०२५ ते ४ मार्च २०२६ या कालावधीत पीडितेचा मानसिक व शारीरिक छळ केला. त्याने विद्यार्थिनीला वारंवार फोन आणि मेसेज करून आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. केबिनमध्ये विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले.

धक्कादायक बाब म्हणजे जोशी याने यापूर्वीही मुलींशी गैरवर्तन केल्याची परिसरात चर्चा सुरु होती. तो वसतिगृहातराहणाऱ्या मुलींशी अनेकदा अपमानास्पद भाषेत बोलत असे. या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने काल, गुरुवारी (दि.७) पोलिसांत धाव घेतली.विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जोशीविरुद्ध विनयभंग, लैंगिक छळ आणि पाठलाग करणे यांसारखे गुन्हे दाखल केले आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर, गोकुळ शिरगाव पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सौरभ जोशी याने विद्यार्थिनीला केलेले मेसेजेस आणि कॉल रेकॉर्ड्स तांत्रिक तपासासाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाविद्यालयाने विश्वस्त मंडळाची बैठक घेऊन प्राध्यापक जोशी यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. तर, विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता जोशी विरोधात तक्रार द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande