
भंडारा, 07 मार्च (हिं.स.)।
शहरात दहशत माजवून तसेच ड्रग्स विक्री प्रकरणातील आरोपी साद जाहीद (बबलु) जामा कुरेशी, हा पोलीस स्टेशन भंडारा परीसरातील अंबिका नगर भोजापुर येथील रहिवासी असुन तो ड्रग्स तस्का व धोकादायक गुंड, खुनसी प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. साद जामा कुरेशी हा सन 2020 पासुन विविध गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय असुन त्याचेवर पोलीस ठाणे भंडारा, येथे प्राणघातक हत्त्यारानीशी गंभिर दुखापत करणे, न्यायपालीकेच्या कार्यक्षेत्रात जावुन साक्षीदार ईसमांना धमकावून शिवीगाळ करून हातात चाकु घेवुन मारण्यास धावने, व्यवसाईक दुकानदार यांना शस्त्राचा धाक दाखवुन त्यांचे दुकानातुन वस्तु घेवुन त्या वस्तुचे पैसे न देता व्यवसाईकांना मारहान करून उलट त्यांच्या दुकानातील गल्यातुन जबरीने पैसे हिस्कावुन घेणे, अंमली पदार्थ गांज्याचे सेवन करणे, तसेच ड्रग्स सोबत बाळगुन नागपुरवरून ईतर ठिकानी ड्रग्स व गांजाची तस्करी करणे, अशा प्रकारचे गंभिर गुन्हे दाखल आहेत. भंडारा पोलिसांनी त्याला अटक करत एम.पी.डी.ए कायद्यान्वये कारवाई केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Pravin Tandekar