राजगड- जेएसडब्ल्यू स्टील डोलवी प्लांटमध्ये महिला कर्मचाऱ्यांचा गौरव
रायगड, 08 मार्च (हिं.स.) । जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेल्या JSW Steel Ltd. च्या डोलवी स्टील प्लांटमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंपनीच्या SIP (Steel Integrated Plant) विभागात कार्यरत असलेल्या महिला
Dolvi JSW Steel honours women's contribution; International Women's Day celebrated


रायगड, 08 मार्च (हिं.स.) । जागतिक महिला दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ असलेल्या JSW Steel Ltd. च्या डोलवी स्टील प्लांटमध्ये उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कंपनीच्या SIP (Steel Integrated Plant) विभागात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान प्लांटचे वरिष्ठ अधिकारी मनीष कडे आणि सुनील म्हात्रे यांनी उपस्थित महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या कार्यातील समर्पण, जिद्द आणि योगदानाचे कौतुक केले. “नवीन संधी आणि आव्हाने सतत उपलब्ध होत आहेत. त्यांचा योग्य लाभ घेऊन तुम्ही अधिक उंची गाठू शकता,” असे सांगत त्यांनी महिलांना प्रोत्साहन दिले. तसेच JSW Steel मध्ये महिलांना समान संधी आणि प्रगतीचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात महिला कर्मचाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी गाणी सादर करून कार्यक्रमात रंगत आणली, ज्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. यावेळी विनया, योगिता आणि मोहिनी यांनी आपले अनुभव, कामातील आव्हाने आणि यशोगाथा शेअर करत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवांमुळे उपस्थितांना उत्साह मिळाला.

यावेळी श्री. मंडल, अभय पाटील आणि भागवत यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे छायाचित्रण समीर यांनी केले. विविध विभागांतील कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमाच्या शेवटी अल्पोपहार देऊन समारोप करण्यात आला. हा कार्यक्रम महिलांच्या योगदानाला मानवंदना देण्याबरोबरच लिंग समानता आणि सशक्तीकरणाबाबत JSW Steel च्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरला. डोलवी प्लांटमध्ये महिलांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्यामुळे कामाचे वातावरण अधिक समावेशक आणि प्रेरणादायी बनत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

---------------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande