अस्मिता उपक्रमातून महिला क्रीडा सहभाग वाढवण्यास प्राधान्य – रक्षा खडसे
छत्रपती संभाजीनगर, 08 मार्च (हिं.स.) – उन्हाळी ऑलिंपिक खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची पदके वाढवण्यासाठी क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल
Raksha Khadse


Raksha Khadse


छत्रपती संभाजीनगर, 08 मार्च (हिं.स.) – उन्हाळी ऑलिंपिक खेळ आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताची पदके वाढवण्यासाठी क्रीडा क्षेत्रात महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे, असे केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांनी सांगितले.

अस्मिता (Achieving Sports Milestone by Inspiring Women Through Action) कार्यक्रमांतर्गत देशभरातील 250 ठिकाणी आयोजित राष्ट्रव्यापी ऍथलेटिक्स लीग च्या उद्घाटन सोहळ्यात खडसे बोलत होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या औचित्याने हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमधील गारखेडा येथील विभागीय क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला.

केंद्रीय राज्यमंत्र्यांनी योग, वुशु, किकबॉक्सिंग आणि भारोत्तोलन लीग चे उद्घाटन केले. तसेच, त्यांनी एसएआयचे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र (एनसीपी), माय-भारत, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि महाराष्ट्र राज्य क्रीडा विभाग यांच्या सहकार्याने आयोजित सायक्लोथॉन व वॉकेथॉन ला हिरवा झेंडा दाखवून महिला तंदुरुस्ती, क्रीडा सहभाग आणि सक्षमीकरणाला प्रोत्साहन दिले.

खडसे म्हणाल्या, “आंतरराष्ट्रीय महिला दिन आपल्याला आठवण करून देतो की महिलांचे हक्क, प्रतिष्ठा आणि समान संधी ही केवळ सामाजिक गरज नाही, तर राष्ट्र उभारणीचा पाया आहे. अस्मिता उपक्रम ग्रामीण, आदिवासी, शालेय व तळागाळातील प्रतिभा ओळखण्यास मदत करतो. सहभाग वाढल्यास स्पर्धात्मकता वाढते आणि पदकांची संख्या देखील वाढते.”

आतापर्यंत, अस्मिता लीगमध्ये 33 क्रीडा प्रकारांमध्ये सुमारे 3 लाख महिलांचा सहभाग नोंदवला गेला असून, 2,600 लीगचे आयोजन करण्यात आले आहे. 2025-26 हंगामात, सुमारे 1.59 लाख महिलांनी 1,287 लीगमध्ये भाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित अस्मिता ऍथलेटिक्स लीग मध्ये मुलींसाठी 100 मीटर, 200 मीटर आणि 4000 मीटर धावस्पर्धा तीन वयोगटात (13 वर्षांखालील, 13–18 वर्ष, 18 वर्षांखालील) घेण्यात आल्या. देशभरातील 250 ठिकाणी झालेल्या या एकदिवसीय स्पर्धेत जवळपास 2 लाख मुलींनी सहभाग घेतला.

खडसे यांनी पुढे सांगितले, “प्रत्येक जिल्हा क्रीडा क्षेत्रात सक्रिय व्हावा, प्रत्येक मुलगी आत्मविश्वासाने पुढे जावी, आणि फिटनेस ही राष्ट्रीय सवय बनवावी. खेलो इंडिया, फिट इंडिया, माय भारत आणि अस्मिता यांच्या माध्यमातून आपण एक सशक्त, तंदुरुस्त आणि समावेशक भारत घडवत आहोत. पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून भारताची क्रीडा परिसंस्था सतत अधिक महिला-केंद्रित होत आहे.”

---------------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande