नागपुरात सेनको गोल्ड अँड डायमंड्स आउटलेटचा शुभारंभ
अभिनेत्री भूमि पेडणेकरच्या उपस्थितीत झाले उद्घाटन नागपूर, 10 एप्रिल (हिं.स.) : नागपूरच्या सराफा बाजारपेठेत आज, शुक्रवारी महत्त्वाच्या प्लेअरची एन्ट्री झाली. देशपातळीवर ख्यातनाम ब्रांड म्हणून लौकिक असलेल्या सेनको गोल्ड अँड डायमन्डसने लक्ष्मीनगर पर
नागपुरात सेनको गोल्ड अँड डायमंड्स आउटलेटचा शुभारंभप्रसंगी अभिनेत्री भूमि पेडणेकर


अभिनेत्री भूमि पेडणेकरच्या उपस्थितीत झाले उद्घाटन

नागपूर, 10 एप्रिल (हिं.स.) : नागपूरच्या सराफा बाजारपेठेत आज, शुक्रवारी महत्त्वाच्या प्लेअरची एन्ट्री झाली. देशपातळीवर ख्यातनाम ब्रांड म्हणून लौकिक असलेल्या सेनको गोल्ड अँड डायमन्डसने लक्ष्मीनगर परिसरात आपल्या नव्या आऊटलेटचा श्रीगणेशा केला. विशेष म्हणजे चंदेरी दुनियेतील तारका भूमि पेडणेकरच्या प्रमुख उपस्थितीत हा शो-रूमचा शुभारंभ झाला.

सेनको गोल्ड अँड डायमंड्सने नागपूरच्या लक्ष्मीनगर परिसरात सुमारे 5 हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण जागेत हे आउटलेट सुरू केलेय. पसरलेले हे स्टोअर शहरातील ब्रँडचे एकमेव आउटलेट असून, आधुनिक रिटेल अनुभव देण्याच्या उद्देशाने ते नव्याने डिझाइन करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि ग्राहकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला.या नव्या स्टोअरमध्ये सोने, हिरे आणि प्लॅटिनम दागिन्यांचे विस्तृत कलेक्शन सादर करण्यात आले आहे. पारंपरिक वारशावर आधारित डिझाइन्सपासून ते आधुनिक आणि आकर्षक स्टाइलपर्यंत विविध पर्याय येथे उपलब्ध आहेत. विशेषतः ‘एवरलाइट’, ‘रेट्रो’ आणि ‘एलिमेंट्स ऑफ नेचर’ यांसारख्या कलेक्शनमुळे ग्राहकांना वेगवेगळ्या डिझाइन शैलींचा अनुभव घेता येणार आहे.

यावेळी सेनको गोल्ड अँड डायमंड्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुवंकर सेन यांनी सांगितले की, “नागपूर ही आमच्यासाठी वेगाने वाढणारी आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध बाजारपेठ आहे. या नवीन स्टोअरमुळे महाराष्ट्रातील आमची उपस्थिती आता 10 स्टोअर्सपर्यंत पोहोचली आहे. आम्ही उत्कृष्ट गुणवत्ता, नाविन्यपूर्ण डिझाइन्स आणि ग्राहक-केंद्रित सेवा देण्यावर भर देत आहोत. यासोबतच स्टोअरचे फ्रँचायझी मालक दवेश लड्डा यांनीही आनंद व्यक्त करत सांगितले की, “नागपूरमध्ये सेनको ब्रँड सादर करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. येथील वाढता आणि जागरूक ग्राहक वर्ग लक्षात घेऊन आम्ही उत्कृष्ट दर्जाचे दागिने आणि समृद्ध शॉपिंग अनुभव देण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

एस. अंबाझरी रोड, लक्ष्मीनगर येथे स्थित हे स्टोअर नागपूरमधील दागिन्यांच्या चाहत्यांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार असून, पारंपरिक कलेचा वारसा आणि आधुनिक वातावरण यांचा सुंदर संगम येथे अनुभवता येईल.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande