
बीड, 15 एप्रिल, (हिं.स.)। कृषीपंपाबाबत येत असलेल्या तक्रारींच्या अनुशंगाने लाभार्थी शेतकऱ्यांच्या सौरकृषीपंपाबाबत असलेल्या विविध तक्रारींची दखल घेत महावितरणे गुरूवार दि.१६ एप्रिल ते २० एप्रिल पासून उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण मेळाव्याचे आयोजन केले आहे. सौरकृषीपंपाबाबत तक्रार असलेल्या लाभार्थ्यांनी याच लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
सौर बीड विभागांतर्गत येणाऱ्या आष्टी, शिरूर, पाटोदा व गेवराई या उपविभागांमध्ये गुरूवारी (दि.१६ एप्रिल) उपविभागीय कार्यालयात जाणून घेवून त्याचे निवारण केले सौरकृषीपंपाबाबतच्या तक्रारी जाणार आहे. तसेच आंबाजोगाई व बीड विभागातील माजलगाव, तेलगाव, बीडशहर व बीड ग्रामीण उपविभागात शुक्रवारी (दि.१७ एप्रिल) तर आंबाजोगाई विभागातील आंबाजोगाई शहर, आंबाजोगाई उपविभाग क्रमांक-१, आंबाजोगाई उपविभाग क्रमांक-२, परळी व केज या उपविभागीय कार्यालयात सोमवारी (दि.२० एप्रिल) तक्रारी जाणून घेवून त्याचे निवारण केले जाणार आहे. दि.१६ ते २० एप्रिल दरम्यान आयोजीत तक्रार निवारण मेळाव्यास शेतकऱ्यांनी उपस्थित रहावे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis