नांदेड- देगलूरच्या रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर
नांदेड, 15 एप्रिल (हिं.स.)देगलूर येथील श्रेणीवर्धित इमारत १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल २२ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली - आहे. राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे
नांदेड- देगलूरच्या रुग्णालयासाठी २२.९७ कोटींचा निधी मंजूर


नांदेड, 15 एप्रिल (हिं.स.)देगलूर येथील श्रेणीवर्धित इमारत १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या बांधकामासाठी तब्बल २२ कोटी ९७ लक्ष रुपयांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली - आहे. राज्यसभा खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा गोरगरिबांच्या आरोग्य सेवेचा महत्त्वाचा विषय मार्गी लागला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पास मंजुरी दिल्याने नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत मोठी भर पडणार आहे.

कर्नाटक व तेलंगणा - राज्यांच्या सीमेजवळ वसलेला - देगलूर तालुका हा व्यापार, - सामाजिक आणि भौगोलिकदृष्टया अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू

आहे. नांदेडनंतर मोठे शहर म्हणून ओळख असलेल्या देगलूरमध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण उपचारासाठी येत असतात. मात्र, अद्ययावत वैद्यकीय सुविधांच्या अभावामुळे रुग्णांना नांदेड किंवा इतर शहरांकडे जावे लागत होते.

या पार्श्वभूमीवर १०० खाटांच्या श्रेणीवर्धित रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी निधी मंजुरी मिळाल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या इमारतीमुळे आपत्कालीन सेवा, तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता आणि आधुनिक आरोग्य सुविधा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार असून सीमावर्ती भागातील हजारो नागरिकांना याचा थेट लाभहोईल.

या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खा. डॉ. गोपछडे यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले आहे. मंत्रालयीन स्तरावर बैठका, पत्रव्यवहार आणि संबंधित विभागांशी समन्वय साधत त्यांनी हा प्रकल्प मार्गी लावला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाल्याने देगलूरच्या विकासाला नवी गती मिळाली आहे. 'राज्य सीमेवरील आरोग्याची निकड पाहता देगलूरमध्ये आता उपचारांचा नवा अध्याय सुरू होणार आहे.' हा निर्णय सीमावर्ती भागासाठी आरोग्य सेवेचा मैलाचा दगड ठरणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande