
छत्रपती संभाजीनगर, 21 एप्रिल (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शिंदे गटात अंतर्गत वाद उफाळला असून, उपमहापौर जंजाळांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले. इच्छुक विनोद बनकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. दरम्यान, जंजाळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावत स्वीकृत नगरसेवकाचे नाव पक्षश्रेष्ठींकडून आल्याचे स्पष्ट केले. आंदोलन करणाऱ्यांविरोधात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्ष शिस्तभंग केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
छत्रपती संभाजी नगर येथे पालकमंत्री आणि नगरसेवक असा वाद निर्माण झाला आहे यातच शिवसेनेमध्ये अंतर्गत कलर निर्माण झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis