रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या उच्चतम व्यावसायिक पुरस्काराचे वितरण
लातूर, 21 एप्रिल (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या उच्चतम व्यावसायिक पुरस्काराचे वितरण नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लातूर शहरात सामाजिक कार्यामध्ये रोटरी अग्रगण्य आहे त्याचाच एक भाग म्हणून समाजातील उच्चतम व्यावसायिक मूल्य जतन करू
रोटरी क्लब


लातूर, 21 एप्रिल (हिं.स.)। रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या उच्चतम व्यावसायिक पुरस्काराचे वितरण नुकतेच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. लातूर शहरात सामाजिक कार्यामध्ये रोटरी अग्रगण्य आहे त्याचाच एक भाग म्हणून समाजातील उच्चतम व्यावसायिक मूल्य जतन करून व्यवसाय करणारे व्यावसायिक यांना हा पुरस्कार दिला जातो. रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर व्हिजिट पब्लिक फंक्शन हॉटेल भारत फाईन डाईन या ठिकाणी संपन्न झाले.

ज्यामध्ये लातूर शहरातील प्रख्यात डॉ. शिरीष मस्के पाटील वैद्यकीय व्यवसाय त्याचबरोबर डॉ. धीरज मानकरी जीवन किसान ऍग्रो, सचिन बांगड ऍडमिशन मेड इझी, शैलेंद्र बलदोटा गुरु गणेश अॅडमिडीया अँड प्रिंटर्स, फिरोज पठाण एस. एम. आर. कॅन्टीन त्याचबरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ द्वारा दिला जाणारा सेवा विशेष पुरस्कार ज्योती धोंडीराम शिंदे, महिला आरोग्य चळवळीतील प्रमुख तसेच संजय शंकरराव मंडाळे यांना दिव्यांग व्यक्तीचे उल्लेखनीय कार्य यासाठी प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे प्रांतपाल सुधीर लातूरे, सौ. संगीता सुधीर लातूरे, सहाय्यक प्रांतपाल एड. श्रीराम देशपांडे व सौ प्रतिभा श्रीराम देशपांडे, डिस्ट्रिकट सेक्रेटरी डॉ. राजगोपाल तापडिया, रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे अध्यक्ष बाळासाहेब खैरे, सौ. ऋतुजा बाळासाहेब खैरे, सचिव डॉ. नेताजी शिंगटे, शितल नेताजी शिंगटे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रकल्प प्रमुख सुदर्शन कांबळे हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हेमंत रामढवे व रवींद्र चामले यांनी केले. कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे माजी अध्यक्ष, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स तथा सर्व सदस्य सहपरिवार उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande