
डोंबिवली, 17 एप्रिल, (हिं.स.)। आगामी २ री आशियाई पॅसिफिक ज्युडो, तायक्वांदो, ग्रीको-रोमन (GR) व फ्रीस्टाईल (FS) कुस्ती स्पर्धा यासाठी ओपन नॅशनल सिलेक्शन ट्रायल्स डोंबिवली येथे शुक्रवारी पूर्वेकडील धर्मवीर आनंद दिघे सभागृह डोंबिवली पूर्व येथे आयोजित करण्यात आल्या. स्पर्धांमध्ये व निवड चाचणी मध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करून जे अव्वल आले आहेत त्यांची निवड करागांडा, कझाकिस्तान प्रजासत्ताक येथे दि. १ जून ते ७ जून २०२६ दरम्यान होणाऱ्या दुसऱ्या एशिया पॅसिफिक स्पर्धेसाठी झाली आहे.
सदर निवड चाचण्या ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र स्पोर्ट्स कौन्सिल ऑफ द डेफ यांच्या यजमानपदाखाली आणि ओंकार कर्णबधिर विकास संस्था, डोंबिवली यांच्यासह यजमानपदाखाली संपन्न झाली.
या स्पर्धेचे तांत्रिक नियोजन डोंबिवलीच्या व्हिक्टरी ज्युदो क्लब सह कुस्तिगीर संघ कल्याण डोंबिवली आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ ठाणे सांभाळत आहेत. उद्घाटन समारंभासाठी आमदार राजेश मोरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच नगरसेवक सुरज मराठे आणि केडीएमसी चे माजी उपसभापती अमित म्हात्रे, व्हिक्टरी जुडो क्लबचे मॅथ्यू सर व लीना ओक मॅथ्यू खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
या निवड चाचण्यांमध्ये देशभरातून खेळाडू सहभागी झाले होते. ज्युदो, तायक्वांदो आणि कुस्ती या क्रीडा प्रकारांमध्ये आपले कौशल्य सादर करणाऱ्या या या खेळाडूंमध्ये कर्णबधीरांच्या ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी झालेले तसेच पहिल्या एशिया पॅसिफिक कर्णबधिर स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा चित्त थरारक खेळ पाहण्यास मिळाला.
ऑल इंडिया स्पोर्ट्स कौन्सिल फॉर डे तर्फे निरीक्षक व निवड चाचणी प्रमुख म्हणून जो साठी सुरेंद्र सिंग साठी अमित भगत व व कुस्तीसाठी रणवीर सिंग राहाल उपस्थित होते..ज्युडो प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच पूर्वा मॅथ्यू लोकरे, आशुतोष लोकरे, कुस्तीचे राजेश भगत व तायक्वांदोच्या अविनाश ओंबसे आणि व्हिक्टरी ज्युदो क्लबच्या स्वयंसेवकांनी स्पर्धा यशस्वी करण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.
हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi