अक्षय तृतीयानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी
अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) । साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बाजारपेठ गजबजली आहे. शहरातील वाहन विक्री दालनात, सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षयतृतीयेला कुठल्याही वस्तूची खरेदी करणे शुभ
अक्षय तृतीयानिमित्त बाजारात खरेदीसाठी गर्दी


अमरावती, 18 एप्रिल (हिं.स.) । साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बाजारपेठ गजबजली आहे. शहरातील वाहन विक्री दालनात, सराफा बाजारात मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. अक्षयतृतीयेला कुठल्याही वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे घर, वाहन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केली जात आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांचे नागरिकांनी बुकिंग केले असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाहन घरी नेणार आहेत. वाहन खरेदीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली जात आहे. तसेच आपल्या बजेटनुसार सेकंड हँड गाड्यांना देखील मोठी मागणी आहे.अक्षय तृतीयेच्या निमित्ताने नवीन सह सेकंड हँड वाहन बाजारात देखील मोठ्या प्रमाणावर उलाढाल होईल, अशी माहिती विक्रेत्यांनी दिली आहे. अक्षयतृतीयेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, मायक्रोवेव्ह ओवन यांसारख्या गृहोपयोगी वस्तूंची खरेदी केली. तसेच वाढत्या उष्णतेपासून गारवा मिळावा. यासाठी एसी, कूलरची देखील मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. विशेषतः तरुणांनी मोबाईल, लॅपटॉप, टॅब, स्मार्टवाच यांसारख्या इलेक्ट्रॉनिक गॅजेटची खरेदी केली.

घागरीला मोठी मागणी अक्षयतृतीयेला पूर्वजांचे घागर भरण्याची पंरपरा आहे. आंबे, घागर खरेदी केले जात आहे. घागर विक्रीसाठी विक्रेत्यांनी शहरातील विविध परिसरात दुकाने थाटली आहेत. घागरीचे दर ७० पासून ते १५० रुपयांपर्यंत आहेत. पूजा-साहित्य, केळीचे पाने, गवरी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी बाजारात होत आहे. ---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande