डोंबिवलीत वीरांगना ट्रस्ट आणि औरिंदम हॉस्पिटलतर्फे मोफत CPR प्रशिक्षण
डोंबिवली, 19 एप्रिल (हिं.स.)। वीरांगना ट्रस्ट आणि औरिंदम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ग्लोब पिनॅकल, अरिंदम् रुग्णालय समोर, पेंढारकर कॉलेज जवळ, ग्लोब स्टुडिओ, डोंबिवली (पूर्व) येथे CPR प्रशिक्षण मोफत आयोजित केले होते. एखाद्या व्यक्त
Photo1


डोंबिवली, 19 एप्रिल (हिं.स.)।

वीरांगना ट्रस्ट आणि औरिंदम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी ग्लोब पिनॅकल, अरिंदम् रुग्णालय समोर, पेंढारकर कॉलेज जवळ, ग्लोब स्टुडिओ, डोंबिवली (पूर्व) येथे CPR प्रशिक्षण मोफत आयोजित केले होते. एखाद्या व्यक्तीचा श्वास किंवा हृदयाचे ठोके थांबले तर आपत्कालीन प्रथमोपचार कसे द्यायचे याबद्दल माहिती देण्यात आली व प्रात्यक्षिक करून दाखविले गेले. यावेळी महिलांना स्वतः प्रात्यक्षिक करण्याची संधीही देण्यात आली.

औरिंदम हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रसन्न महाजन, डॉ. ज्योती सुळे, डॉ. प्रिती नंदा यांनी महिलांना अतिशय मोलाची माहिती दिली व त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. या CPR प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी चक्रपाणी शुक्ला यांनी सर्वोतोपरी मदत केली. वीरांगणा ट्रस्टच्या तर्फे डॉ. प्रसन्न महाजन, डॉ ज्योती सुळे, डॉ. प्रिती नंदा व औरिंदम हॉस्पिटलची टिम उपस्थित होती. वीरांगना ट्रस्टच्या उमा सिंग (अध्यक्षा), शुभांगी मगर (सचिव),

माधुरी शिंदे (खजिनदार) यांच्यासह इतर पदाधिकारी व संस्था सदस्यांनी प्रशिक्षण शिबिर यशस्वी होण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

या CPR प्रशिक्षणबाबत माहिती देताना उपस्थित डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके थांबतात किंवा श्वास थांबतो, तेव्हा वापरली जाणारी ही एक आपत्कालीन जीवनरक्षक प्रक्रिया म्हणून सीपीआर (कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन) पद्धत अमलात आणतात. याचा उद्देश की, हृदयविकाराचा झटका आल्यास फुफ्फुसे आणि हृदय पुन्हा सुरू करणे आणि मेंदूला ऑक्सिजन पोहोचवणे. या प्रक्रियेत यामध्ये छातीवर वेगाने दाब देणे आणि कृत्रिम श्वास देणे असा समावेश असतो.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande