सुशीलकुमार शिंदेंचा कट्टर समर्थक रॉकी पालकमंत्र्यांच्या गाडीत; चर्चेला उधाण
सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)। माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले रॉकी बंगाळे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गाडीत पाहायला मिळाले. सध्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
Roki


सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)।

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले रॉकी बंगाळे हे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या गाडीत पाहायला मिळाले. सध्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

पंढरपूर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक होती. त्या मिरवणुकीला पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी उपस्थिती लावली. जयंती उत्सव अध्यक्ष अभिराज उबाळे यांनी सोलापुरातील अनेक नेत्यांना मिरवणुकीचे निमंत्रण दिले होते त्या अनुषंगाने रॉकी बंगाळे हे सुद्धा पंढरपूरला गेले होते. त्या ठिकाणी पालकमंत्री आणि बंगाळे यांचे भेट झाली भेट अशी झाली की पालकमंत्र्यांनी बंगाळे यांना थेट आपल्या गाडीत बसवून घेतले आणि ते दोघे शासकीय विश्राम घराकडे गेले. गाडीत बसलेले या दोघांचे फोटो, व्हिडिओ फेसबुकवर चर्चेचा विषय ठरला आहे.

महापालिकेच्या निवडणुकीत रॉकी बंगाळे हे प्रभाग 6 मधून काँग्रेसकडून इच्छुक होते परंतु पक्षाने त्यांना तिकीट डावलले त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली. तेव्हापासून ते काँग्रेसपासून दूरच पाहायला मिळतात मात्र सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून रॉकी बंगाळे यांची ओळख आहे.

बंगाळे हे पालकमंत्र्याच्या सहवासात गेल्याने आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार का? अशाही चर्चेने जोर धरला आहे. आज पुन्हा सोलापुरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मिरवणूक आहे त्यातही पालकमंत्री सहभागी होणार असल्याचे समजते त्यामुळे पुन्हा बंगाळे पालकमंत्री यांची या ठिकाणी भेट होईल.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande