बसवेश्वर जयंतीनिमित्त सोलापूर महापालिकेकडून अभिवादन
सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)। : जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देव
Jg


सोलापूर, 19 एप्रिल (हिं.स.)।

: जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बसवेश्वर चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा बसवेश्वरांच्या कार्याला व विचारांना अभिवादन केले.

त्यानंतर कौन्सिल हॉल येथील जगत ज्योती महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेची विधिवत पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच महापौर कार्यालयातही महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी अन् नेते, पदाधिकारी य यांच्यासह बसव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर यांच्या समाजप्रबोधनात्मक विचारांचा जागर करण्यात आला असून, उपस्थितांनी त्यांच्या आदर्शांचे पालन करण्याचा संकल्प व्यक्त केला

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande