राज्यसभेत राघव चड्ढांना हटवून आपकडून अशोक मित्तल यांची उपनेतेपदी नियुक्ती
नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)आम आदमी पार्टीने (आप) खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून ही माहिती दिली. त्याचबरो
राघव चड्ढा


नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)आम आदमी पार्टीने (आप) खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेच्या उपनेतेपदावरून हटवले. त्यांच्या जागी राज्यसभा खासदार अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने राज्यसभा सचिवालयाला पत्र लिहून ही माहिती दिली. त्याचबरोबर, पक्षाने अशोक मित्तल यांच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवून त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. मित्तल हे राज्यसभेचे सदस्य असून, आता त्यांना उपनेतेपदी नियुक्त करून पक्षाने त्यांच्यावर आणखी मोठी जबाबदारी टाकली आहे. ते सभागृहात पक्षाची रणनीती अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी काम करतील, असा विश्वास आहे.

अशोक मित्तल हे पंजाबमधून 'आप'चे राज्यसभा खासदार आहेत. ते जालंधरचे रहिवासी असून पंजाबमधील 'लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी'चे संस्थापक आणि कुलपती आहेत. ते २०२२ मध्ये राज्यसभा खासदार झाले. राजकारणात येण्यापूर्वी ते एक यशस्वी उद्योजक होते.

राघव चड्ढा यांनी राज्यसभेत पक्षाचे उपनेते म्हणून दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली होती. ते पक्षातील एक प्रमुख व्यक्तिमत्व मानले जात होते आणि त्यांनी संसदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले होते. त्यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे.

राघव हे २०२२ पासून पंजाबमधून राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांचा कार्यकाळ २०२८ मध्ये संपत आहे. पक्षाने या निर्णयामागे कोणतेही कारण दिलेले नाही. पण, ते बऱ्याच काळापासून पक्षापासून दूर होते आणि 'आप'बद्दल कोणतेही वक्तव्य करत नव्हते. २७ फेब्रुवारी रोजी, जेव्हा एका कनिष्ठ न्यायालयाने दिल्ली दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना दिलासा दिला, तेव्हा त्यांनी कोणतेही वक्तव्य केले नाही. राज्यसभेतही ते गिग वर्कर्स आणि शालेय शुल्काचा मुद्दा उपस्थित करत होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande