पंतप्रधानांनी हनुमान जयंती निमित्त दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी प्रार्थना केली आहे की, हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. “पवनपुत्र हनुमानाच्या असीम शक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी


नवी दिल्ली, 02 एप्रिल (हिं.स.)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हनुमान जयंतीनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. मोदी यांनी प्रार्थना केली आहे की, हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि उत्साह घेऊन येईल. “पवनपुत्र हनुमानाच्या असीम शक्ती, बुद्धी व ज्ञानाच्या आशीर्वादाचा वर्षाव सर्वांवर व्हावा, आणि त्यामुळे आपल्या देशाचे सामर्थ्य उत्तरोत्तर वृद्धिंगत व्हावे अशी मी कामना करत आहे.” असे मोदी यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले की, “सर्व देशवासियांना हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा पवित्र सण प्रत्येकाच्या जीवनात नवी ऊर्जा आणि स्फूर्ती घेऊन येवो. माझी कामना आहे की पवनपुत्र हनुमानजी सर्वांना बल, बुद्धी आणि विद्या यांचे भरभरून आशीर्वाद देवोत, ज्यामुळे देशाचे सामर्थ्य अधिक वाढेल. जय बजरंगबली!”

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande