‘सनई चौघडे’ मालिकेत चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री
मुंबई, 02 एप्रिल, (हिं.स.)। झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप १० मालिकांच्या यादीत सनई चौघडे
चिन्मय मांडलेकरची दमदार एंट्री!


मुंबई, 02 एप्रिल, (हिं.स.)। झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ ही मालिका पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे. लालबाग परळ मधील हे मध्यमवर्गीय कुटुंब लोकांना भावतं आहे. म्हणून मालिका सुरू होताच पहिल्याच आठवड्यात टॉप १० मालिकांच्या यादीत सनई चौघडे मालिकेनं स्थान मिळवलं. कथानकातील वेगळेपणा आणि भावनिक गुंतवणूक आणि स्वामींचा आशीर्वाद यामुळे प्रेक्षकांकडून मालिकेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. मालिकेच्या लाँच आठवड्यात एक अनोखा उपक्रम राबवला गेला. पमा परब आणि तिच्या कुटुंबाने ७००० हून अधिक स्वामी भक्तांसोबत ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’ पठण करत ‘वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडिया’ मध्ये नोंद केली.

आता मालिकेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होताच प्रेक्षकांसाठी आणखी एक खास सरप्राईज असणार आहे. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सने ओळखला जाणारा, बहुप्रतिभावान आणि संवेदनशील भूमिका साकारणारा अभिनेता चिन्मय मांडलेकर ‘सनई चौघडे’मध्ये दमदार कमबॅक करत आहे. तो मालिकेत ‘सत्यजीत’ ही भूमिका साकारणार आहे.

सध्या कथानकात शर्वरी नोकरीसाठी मुलाखती देताना दिसत आहे. योगायोगाने ती ज्या कंपनीत इंटरव्ह्यू देते, ती कंपनी सत्यजीतचीच आहे. त्याचवेळी जय खानोलकरही एका बिझनेस डीलसाठी सत्यजीतला भेटायला येतो. या योगायोगमुळे कथानकाला नवा ट्विस्ट मिळणार आहे.

शर्वरीला ही नोकरी मिळेल का? सत्यजीतच्या एंट्रीमुळे जय आणि शर्वरीच्या नात्यात काही बदल होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ‘सनई चौघडे’, दररोज रात्री ८:३० वाजता, सदैव तुमच्या झी मराठीवर.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande