अमरावती - अकरा हजार चारशे शेतकऱ्यांनी डाउनलोड केले अॅप
अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.) शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक फायदे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार ॲप विकसित केले असून या माध्यमातून शेतीला आधुनिक क्रांतीची जोड लाभली आहे. अमरावती तालुक्यातील अकरा हजार शेत
शेतकऱ्यांच्या शेतीला आधुनिक क्रांतीची जोड अकरा हजार चारशे शेतकऱ्यांनी डाउनलोड केले अॅप


अमरावती, 21 एप्रिल, (हिं.स.) शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक फायदे व्हावे, यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार ॲप विकसित केले असून या माध्यमातून शेतीला आधुनिक क्रांतीची जोड लाभली आहे. अमरावती तालुक्यातील अकरा हजार शेतकऱ्यांनी हे अॅप डाउनलोड केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित समस्यांवर त्वरित उपाय मिळवून देण्यासाठी हे अॅप डिझाइन करण्यात आले आहे. या ॲपमुळे शासनाच्या योजना माहिती व अन्य बरेच काही एकाच ॲपमध्ये समाविष्ट आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात पस्तीस हजार शेतकरी असून त्यापैकी केवळ अकरा हजार चारशे शेतकऱ्यांनीच महाविस्तार ॲप डाउनलोड केले. अद्याप बरेच शेतकऱ्यांनी अॅप डाउनलोड करायचे बाकी आहे. शेतकऱ्यांना वेळोवेळी प्राथमिक समस्या निर्माण होतात, त्या प्राथमिक समस्येवर उपाय हा महाविस्तार ॲपच्या माध्यमातून मिळण्यास मदत होते. तर ॲपमध्ये महाडीबीटी पोर्टलसारख्या शासनाच्या योजना असणाऱ्या लिंकचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. हवामान, दैनंदिन बाजार भाव, तज्ञांचे मार्गदर्शन व विविध शेतीविषयक सल्ले, उपाययोजना व माहिती यांच्या माध्यमातून सामान्य ते अतिसामान्य शेतकऱ्यांपर्यंत सहज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या ॲपच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल, असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

महाविस्तार ॲप हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे ॲप असून शेतीच्या नियोजनात महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप नोंदणी करून ॲपचा वापर करावा. -प्रशांत गुल्हाने, तालुका कृषी अधिकारी.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande