
छत्रपती संभाजीनगर, 21 एप्रिल, (हिं.स.)। छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय घाटीमध्ये रुग्ण सेवा देणाऱ्या परिचारिकांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. जुनी पेन्शन योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे, यासाठी अन्य मागण्यांसाठी काम बंदचा आक्रमक पावित्रा घेतल्याने रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत चर्चा सुरू असली तरी अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आजही समाधानकारक निर्णय न झाल्यास संप सुरूच ठेवण्याचा इशारा परिचारिकांनी दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis