परभणी : महानगरपालिकेतील सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती तसेच सहा विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार, सभापती पदासाठी नामनि
अ


परभणी, 21 एप्रिल (हिं.स.)महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती तसेच सहा विशेष समित्या आणि प्रभाग समित्यांच्या सभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार, सभापती पदासाठी नामनिर्देशन पत्रांचे वितरण व स्वीकृती 22 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. या दिवशी कार्यालयीन वेळेत (सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) नगर सचिव कार्यालय, मनपा सभागृह येथे नामनिर्देशन पत्रे उपलब्ध करून देण्यात येतील तसेच स्वीकारली जाणार आहेत.

नामनिर्देशन पत्रांची छाननी समितीच्या विशेष सभेत करण्यात येणार असून, सभागृहात पिठासीन अधिकारी यांच्याकडून छाननी प्रक्रिया पार पडेल. छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे जाहीर करण्यात येतील. त्यानंतर इच्छुक उमेदवारांना 15 मिनिटांच्या आत लेखी अर्जाद्वारे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची संधी दिली जाणार आहे.

सभापती निवड प्रक्रिया 24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून क्रमाने सुरू होईल. आवश्यक असल्यास मतदान प्रक्रियेद्वारे निवड करण्यात येईल. यावेळी पिठासीन अधिकारी उमेदवारांची नावे वर्णानुक्रमाने जाहीर करतील आणि हात वर करून मतदान नोंदवले जाईल. या निवडणुकीत प्रभाग समिती अ, ब, क चे सभापती तसेच गलिच्छ वस्ती निर्मूलन, घरबांधणी व समाजकल्याण, महिला व बालकल्याण, स्थापत्य, वैद्यकीय व सहाय्य आरोग्य, विधी व महसूल वाढ, शहर सुधार आणि माध्यमिक, पूर्व माध्यमिक व तांत्रिक समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि नगरसचिव विकास रत्नपारखे यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande