काँग्रेस नेते हिदायत पटेल हत्याकांडातील आरोपीला नागपूरातून अटक
अकोला, 24 एप्रिल (हिं.स.)।काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी राजू बोचे याला अखेर नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता.आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अ
Photo


अकोला, 24 एप्रिल (हिं.स.)।काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्याप्रकरणातील संशयित आरोपी राजू बोचे याला अखेर नागपूर येथून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता.आरोपीला ताब्यात घेण्यासाठी अकोट ग्रामीण पोलिसांचे पथक नागपूरला रवाना झाले होते. राजू बोचे याला लवकरच अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अटकेनंतर हिदायत पटेल यांच्या समर्थकांचे लक्ष आता उर्वरित फरार आरोपींकडे लागले आहे.६ जानेवारी २०२६ रोजी अकोट येथील मोहाळा येथे हिदायत पटेल यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पटेल यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.दरम्यान, या प्रकरणातील अन्य आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande