जुन्या वैरातून चिडवाचिडवीतून तरुणाचा मृत्यू; मंगळवेढ्यात खळबळ
सोलापूर, 25 एप्रिल, (हिं.स.)। जुन्या वैरातून झालेल्या चिडवाचिडवीतून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा, बालाजीनगर येथे घडली आहे. ग्रामपंचायत समोर गणपती पवार यांच्या हॉटेलजवळ हा प्रकार घडला. दिव्यांग रणज
जुन्या वैरातून चिडवाचिडवीतून तरुणाचा मृत्यू; मंगळवेढ्यात खळबळ


सोलापूर, 25 एप्रिल, (हिं.स.)। जुन्या वैरातून झालेल्या चिडवाचिडवीतून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा तालुक्यातील लमाणतांडा, बालाजीनगर येथे घडली आहे. ग्रामपंचायत समोर गणपती पवार यांच्या हॉटेलजवळ हा प्रकार घडला. दिव्यांग रणजीत सुभाष राठोड याला शशिकांत शिवाजी पवार (३३) याने डोक्यावरील टोपी काढून चिडवले. त्यावरून रणजीतने संतापाच्या भरात शशिकांतच्या दुचाकीला लाथ मारली. यानंतर शशिकांतने रणजीतला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

दरम्यान, रणजीतला सोडवण्यासाठी त्याचा भाऊ सुजीत सुभाष राठोड (१८) घटनास्थळी आला असता, शशिकांत पवार, त्याचा भाऊ आशिष शिवाजी पवार (३०) आणि सागर राम राठोड (२५) यांनी मिळून सुजीतवरही हल्ला केला. यावेळी शशिकांतने सुजीतच्या उजव्या कानामागे दगडाने जोरात वार केल्याने तो जागीच कोसळला.जखमी सुजीतला प्रथम मंगळवेढा येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक वैद्यकीय अहवालानुसार डोक्यातील अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी मृताचे वडील सुभाष उमाजी राठोड (४९) यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून शशिकांत पवार, आशिष पवार आणि सागर राठोड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, आरोपींना अटक होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची ठाम भूमिका नातेवाईक आणि गावकऱ्यांनी घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande