
लातूर, 24 एप्रिल (हिं.स.): अवैध गुटखा विक्री व तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर साठवणुकीविरुद्ध लातूर पोलीस दलाने जिल्हाभर एकाच वेळी धाडसत्र राबवत मोठी कारवाई केली.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांच्या पथकांनी अहमदपूर, रेणापूर, औराद शहाजनी, मुरुड, निलंगा, भादा, औसा, उदगीर शहर व उदगीर ग्रामीण भागात एकाच वेळी छापेमारी केली. एकूण 11 गुन्हे दाखल करण्यात आले. यात गुटखा विक्री, कोटपा (COTPA) कायद्याचे उल्लंघन तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्ह्यांचा समावेश आहे.
गुटखा प्रतिबंधक कायद्यान्वये 5 गुन्हे दाखल
कोटपा कायद्यान्वये 6 कारवाया
कारवाईतील आरोपी (संक्षिप्त माहिती)
जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतर्गत 11 आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले असून, काहींना अटक करण्यात आली आहे तर काही आरोपी फरार आहेत.
जप्त मुद्देमाल
या कारवाईत आरोपींकडून एकूण 8,97,152 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला, तंबाखूजन्य पदार्थ व सिगारेट जप्त करण्यात आले.
कायद्यांनुसार कारवाई
ही कारवाई कोटपा अधिनियम 2003, भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम 2006 अंतर्गत करण्यात आली आहे. विशेषतः शाळा परिसर व सार्वजनिक ठिकाणी अल्पवयीनांना तंबाखू विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्पष्ट केले की, समाजाच्या आरोग्याशी संबंधित अशा प्रकरणांमध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही आणि पुढील काळातही कारवाई अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis