'इन्स्पेक्टर मंजू मध्ये स्नेहल शिदमच्या एन्ट्रीने धुमाकूळ
मुंबई, 24 एप्रिल, (हिं.स.)। ''सन मराठी''वरील ''इन्स्पेक्टर मंजू'' व ''जुळली गाठ गं'' या दोन्ही मालिकांमध्ये रंजक वळणे आली आहेत. ''इन्स्पेक्टर मंजू'' मालिकेत सत्या वृद्ध माणसाच्या वेषात प्रत्येकाला चांगलाच धडा शिकवत असताना दिसत आहे. त्
'इन्स्पेक्टर मंजू मध्ये स्नेहल शिदमच्या एन्ट्रीने धुमाकूळ ;'रोमँटिक सणवार मध्ये सत्या-मंजू व धैर्य-सावी मध्ये फुलणार प्रेम*


मुंबई, 24 एप्रिल, (हिं.स.)। 'सन मराठी'वरील 'इन्स्पेक्टर मंजू' व 'जुळली गाठ गं' या दोन्ही मालिकांमध्ये रंजक वळणे आली आहेत. 'इन्स्पेक्टर मंजू' मालिकेत सत्या वृद्ध माणसाच्या वेषात प्रत्येकाला चांगलाच धडा शिकवत असताना दिसत आहे. त्यात आर्यनचा खरा चेहरा कसा समोर आणायचा यासाठी सत्या- मंजू दोघेही प्रयत्न करत आहेत. अशातच सध्या घरात आर्यन व मंजू यांच्या लग्नाची बोलणी सुरु असताना आर्यन त्याच्या आत्याला लग्नाच्या बोलणीसाठी घेऊन येतो. मालिकेत आत्याची भूमिका अभिनेत्री स्नेहल शिदम साकारताना दिसणार आहे. आत्याची एंट्री होताच ती सत्याच्या प्रेमात पडते. आता मालिकेत लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे. या सगळ्यात सत्याला मंजूसोबत निवांत वेळ मिळत नसल्यामुळे सत्या तिच्यासाठी सुंदर सरप्राईज प्लॅन करतो.आत्याच्या एन्ट्रीमुळे सत्या - मंजू मध्ये पुन्हा दुरावा निर्माण होईल का? आत्या सत्याच्या प्रेमात पडल्याने मालिकेत मजेदार ट्विस्ट येत्या २६ एप्रिलला १ तासाच्या महाएपिसोड मध्ये दुपारी १ व रात्री ८ वाजता पाहायला मिळणार आहे.

'जुळली गाठ गं' या मालिकेत सावी- धैर्य यांच्या नात्यात बऱ्याच अडथळ्यांनंतर धैर्य- सावी एकत्र आले आहेत. धैर्य सावी दोघेही हनिमूनला जाण्याचा प्लॅन करतात. धैर्य सावीला खुश करण्यासाठी वेगवेगळे सरप्राईज प्लॅन करतो. या खास डेट मध्ये धैर्य सावीला एक सुंदर ड्रेस गिफ्ट करतो. सावीचा हा नवा लूक पाहून धैर्य नव्याने तिच्या प्रेमात पडतो. प्रत्येक अडचणींवर मात करत या दोघांचं नातं जिंकल असल्याचं पहायला मिळतंय. मालिकेच्या या नव्या प्रोमोमुळे मालिकेत पुढे काय घडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. प्रेक्षकांच्या मागणीला पूर्ण करत धैर्य सावीच नात आता पूर्णत्वास जाणार आहे. या प्रवासात सावी आणि धैर्य वेगळ्या रूपात पहायला मिळणार आहे. हा रोमँटिक भाग येत्या २६ एप्रिलला १ तासाच्या महाएपिसोड मध्ये दुपारी २ व रात्री ९ वाजता पाहायला मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande