

नाशिक, 25 एप्रिल, (हिं.स.)। नाशिक (पूर्व) विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड राहुल ढिकले यांच्या पत्नी आदिती ढिकले यांचे ह्दयविकाराने आज निधन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार ॲड ढिकले यांच्या निवासस्थानी भेट देवून ढिकले कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी त्यांचे समवेत जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार सरोज अहिरे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, तहसलीदार पंकज पवार, अपर तहसीलदार अमोल निकम आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV