शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसह सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावा :  मंत्री मुश्रीफ
कोल्हापूर, 25 एप्रिल (हिं.स.)।शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षका
शाळा इमारतीचे भूमिपूजन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते


कोल्हापूर, 25 एप्रिल (हिं.स.)।शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्याच्या जडणघडणीमध्ये शिक्षकांसह पालकांचीही जबाबदारी तितकीच मोठी आहे, असेही ते म्हणाले.

तमनाकवाडा ता. कागल येथे जिल्हा परिषदेच्या 'विद्यामंदिर तमनाकवाडा' या प्राथमिक शाळेच्या आठ खोल्यांच्या शाळा इमारतीचे भूमिपूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पाताई शशिकांत खोत होत्या.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, या शाळेची इमारत आणि परिसर सुशोभीकरणासह भौतिक सोयी- सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शाळेची ही नवीन इमारत बांधून पूर्ण झाल्यानंतर वास्तुशांती समारंभाला सर्वच माजी विद्यार्थ्यांना निमंत्रण द्या. या शाळेत शिकलेल्या आणि शिकून मोठे झालेल्या गावातील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून ई- लर्निंगसह सर्व शाळा डिजिटल बनवा.

मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, प्राथमिक शाळांचा पट दिवसेंदिवस घटत आहे. त्याची कारणेही अनेक आहेत. मुलगा बालपणापासूनच इंग्रजी फाडफाड बोलायला शिकला पाहिजे, अशी आई-वडिलांची अपेक्षा असते. त्यामुळे त्यांचा ओढा खाजगी इंग्रजी शाळांकडे असतो. जिल्हा परिषदेच्या शाळामधूनच शिक्षकांनी सेमी इंग्लिश शिकवण्याची गरज आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर अपार परिश्रम करण्याची गरज आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांकडे पाठ फिरवून विद्यार्थी इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळाकडे वाढणार नाहीत, याची दक्षता घेण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाकडेही लक्ष द्या.

*शिक्षण हे वाघिणीचे दूध.....!*

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, महामानव भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते मिळविणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे चांगले गुणवत्त व दर्जेदार शिक्षण घ्या.

यावेळी जिल्हा परिषदेच्या.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पाताई खोत, कागल पंचायत समितीच्या सदस्या श्रीमती सुनिता राजाभाऊ माळी, कागल पंचायत समितीचे सदस्य दिपक सोनार, हमीदवाडा कारखान्याचे संचालक दत्तात्रय चौगुले, डी. आर चौगुले, आनंदा कोकीतकर, अर्जुन म्हसाळकर, बळवंत तिप्पे, भिकाजी तिप्पे, दयानंद साळवी, संजय गोरे, आप्पासो सांडगे, सौरभ तिप्पे, विक्रम कसलकर, रावसाहेब पाटील, दिलीप तिप्पे, निवृत्ती तिप्पे, बाळासाहेब चौगुले, चंद्रकांत तिप्पे, बापूसो तिप्पे, शामराव पाटील आदी प्रमुख उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar


 rajesh pande