
नाशिक, 25 एप्रिल, (हिं.स.)। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महंत हरिगिरीजी महाराज (जुना आखाडा), महंत रविंद्रपुरीजी महाराज (निरंजनी आखाडा), महंत शंकरानंद (आनंद आखाडा), महंत गिरिजानंद, महंत रामकृष्ण लहवितकर, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार हिरामण खोसकर, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्यासह मंदिर देवस्थानचे विश्वस्त उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दर्शन घेऊन पूजा केली. मंदिर देवस्थानच्या वतीने मुख्याधिकारी योगेश जाधव, कैलास घुले, मनोज थेटे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV