'आप'ने आत्मचिंतन करण्याची गरज - राघव चड्ढा
नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) - जो व्यक्ती ''आप''शी जोडलेला होता, तो एकतर पक्ष सोडून गेला आहे किंवा सोडत आहे. आम्ही ७ खासदारांनी मिळून पक्ष सोडला आहे. ''आप''चे नेते म्हणत आहेत की आम्ही घाबरलो आहोत, परंतु आम्ही घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष
राघव चड्ढा


नवी दिल्ली, 25 एप्रिल (हिं.स.) - जो व्यक्ती 'आप'शी जोडलेला होता, तो एकतर पक्ष सोडून गेला आहे किंवा सोडत आहे. आम्ही ७ खासदारांनी मिळून पक्ष सोडला आहे. 'आप'चे नेते म्हणत आहेत की आम्ही घाबरलो आहोत, परंतु आम्ही घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला आहे. उलट 'आप'ने या सर्व मुद्द्यांवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे राघव चड्ढा यांनी म्हटले आहे. 'आप'चा दिल्ली निवडणुकीत पराभव होण्यामागे 'शीशमहल' हे एक मोठं कारण होतं. आता एक वर्ष उलटत नाही तोच पक्ष 'शीशमहल २' वादात अडकला आहे, असेही म्हटले आहे.

राघव चड्ढा शनिवारी माध्यमांशी बोलत होेते. ते पुढे म्हणाले की, दिल्लीत तयार झालेल्या 'शीशमहल पार्ट २' चे काही फोटो समोर आले आहेत. जेव्हा पहिला 'शीशमहल' बांधला गेला होता, तेव्हाच आम आदमी पक्षाची प्रतिमा मलिन झाली होती. माझ्या मते, दिल्ली निवडणुकीत पराभवाचे सर्वात मोठं कारण कोणतं असेल, तर त्यात या 'शीशमहल'चा समावेश होता. आम आदमी पक्षाला दिल्ली निवडणूक हरून अद्याप एक वर्षही पूर्ण झालेलं नाही आणि आता 'शीशमहल पार्ट २' प्रकरण समोर आलं आहे. समोर आलेले फोटो पाहिल्यास स्पष्ट होतं की, हे निवासस्थान अत्यंत आलिशान बनवण्यात आलं आहे. पक्षात जे काही मोजके चांगले कार्यकर्ते उरले आहेत, ते या सर्वांना कसं उत्तर देणार? गल्ली-परिसरात जेव्हा लोक 'शीशमहल'बद्दल प्रश्न विचारतील, तेव्हा ते काय सांगणार? 'आप'ने या विषयांवर गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा टोलाही लगावला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande