
छत्रपती संभाजीनगर, 25 एप्रिल (हिं.स.)।
वाळूज महानगरातील
आरएक्स सेक्टर, बजाजनगर येथील श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिराचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. मंदिरात संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, श्री विठ्ठल-रुक्मिणी तसेच, श्री गणेश यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्ताने परिसरात कलशासह मिरवणूक काढण्यात आली.
पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या सहकायनि तसेच लोकवर्गणीतून स्थानिक महिला गटाच्या प्रयत्नांनी मंदिर व सभागृहाचे नूतनीकरण करण्यात आले. मूर्तीचा अभिषेक नामदेव महाराज चारठाणकर यांच्या हस्ते करण्यात आला. वेदांत-कीर्ती गुजर तसेच, गौरव-ऐश्वर्या पाटील यांनी यजमानपद भूषविले. सुनील शिंदे यांच्या हस्ते मंदिरात कलशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. नामदेव महाराज चारठाणकर
यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून सामुदायिक महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी जागृत हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तात्या वानखेडे, उद्योजक कैलास गुजर, अनिल पाटील, मदन दराडे आदींसह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. कार्यक्रमासाठी श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराज मंदिर, पंचमुखी महाराज मंदिर समिती, तसेच महिला मंडळांनी पुढाकार घेतला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis