छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमित शाह यांचे विनम्र अभिवादन
नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. ''एक्स'' वरील एका संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वाभिमानाचे अजरामर प्रतीक आणि
Amit Shah Pays Tributes Chhatrapati Shivaji Maharaj Death Anniversary


नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.)। केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले.

'एक्स' वरील एका संदेशात अमित शाह यांनी म्हटले आहे की, भारतीय स्वाभिमानाचे अजरामर प्रतीक आणि राष्ट्रगौरवाचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मरण करून मी त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी त्यांनी लोकसंघटन केले आणि हिंदवी स्वराज'ची स्थापना केली. समुद्रावरील नियंत्रणाचे महत्त्व ओळखून त्यांनी उभारलेले शक्तिशाली आरमार, त्यांच्या अद्वितीय धोरणाचे आणि दूरदर्शी नेतृत्वाचे दर्शन घडवते. एक राजा आपल्या संस्कृतीचे आणि भाषेचे रक्षण करण्यासोबतच लोककल्याणाचे आदर्श कसे उभे करू शकतो, यासाठी त्यांचे जीवन एक उत्तम उदाहरण आहे. त्यांचा अखंड संघर्ष आणि जीवनगाथा देशाला मातृभूमीप्रती समर्पित राहण्याची प्रेरणा कायम देत राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande