
नवी दिल्ली, 03 एप्रिल (हिं.स.)। उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन शनिवार, ४ एप्रिल रोजी एक दिवसीय दौऱ्यावर बिहारला जाणार आहेत. या दौऱ्यात ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.
उपराष्ट्रपती सचिवालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती राधाकृष्णन ४ एप्रिल रोजी बिहार दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते मोतिहारी येथील महात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ते पश्चिम चंपारणमधील भितिहरवा गांधी आश्रमालाही भेट देतील.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule