“राजकारणासाठी लाचारी अयोग्य”, बच्चू कडू प्रकरणावर बावनकुळे यांची टीका
अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) । आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी किंवा आमदार होण्यासाठी अशा प्रकारची ल
बच्चू कडू प्रकरणावर बावनकुळे यांची टीका; “राजकारणासाठी लाचारी अयोग्य”


अमरावती, 03 एप्रिल (हिं.स.) । आमदार बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी किंवा आमदार होण्यासाठी अशा प्रकारची लाचारी स्वीकारणे हे अत्यंत चुकीचे असून, हे लोकशाहीला घातक असल्याची टीका त्यांनी केली.

बावनकुळे म्हणाले की, राजकारणात निवडणुका येत-जात असतात. मात्र, निवडून आलेल्या व्यक्तीवर हल्ला करणे, त्यांच्याविरोधात षडयंत्र रचणे किंवा त्यांच्या जीवावर उठणे हे कुठल्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारच्या घटना लोकशाही व्यवस्थेला काळिमा फासणाऱ्या आहेत.पुढे ते म्हणाले की, या प्रकरणी वेळेत पोलिसांत तक्रार दाखल झाली नसती, तर हा कट यशस्वी झाला असता आणि बच्चू कडू तसेच त्यांच्या भावाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. त्यामुळे पोलिसांनी योग्य वेळी कारवाई करून मोठा अनर्थ टाळला, असेही त्यांनी नमूद केले.या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande