डोंबवलीत श्री महावैष्णव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव
डोंबिवली, 03 एप्रिल (हिं.स.)।पूर्वेकडील नांदिवली येथील श्री मारुती मंदिर चौकात प्रसिद्ध असलेल्या श्री महावैष्णव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर सुवासिक फुलांनी सजविण्यात आले होते. माजी नगरसेविका रूपाली रवि म्हात्रे
Photo1


डोंबिवली, 03 एप्रिल (हिं.स.)।पूर्वेकडील नांदिवली येथील श्री मारुती मंदिर चौकात प्रसिद्ध असलेल्या श्री महावैष्णव मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संपूर्ण मंदिर सुवासिक फुलांनी सजविण्यात आले होते. माजी नगरसेविका रूपाली रवि म्हात्रे आणि कुटुंबीय तसेच मंडळाचे उत्सव समिती प्रमुख रवि म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा अत्यंत भव्य आणि दैदीप्यमान स्वरूपात संपन्न झाला.

या वर्षीच्या हनुमान जन्मोत्सव सोहळ्यात सुमारे सात ते आठ हजार भाविकांच्या उपस्थितीने मंदिर परिसर भक्ति रसाने आणि उत्साहाने भारावून गेले होते. प्रसिद्ध गीत रामायण गायक निनाद आजगावकर यांच्या गीत रामायण या सुरेल कार्यक्रमाने वातावरण राम मय करून टाकले होते. हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोत्यांनी दोन तास मंत्रमुग्ध होऊन या भक्ति संगीताचा आनंद घेतला. हा मंगल सोहळा यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका रूपाली रवि म्हात्रे, उत्सव समिती प्रमुख रवि म्हात्रे, विशेष सहकारी अंकुश राणे, मंडळाचे अध्यक्ष संदीप दिघे, उपाध्यक्ष संतोष नारकर, कोषाध्यक्ष रविंद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande