गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना प्रेम, करुणा आणि बंधुत्व स्वीकारण्याचे आवाहन
नवी दिल्ली , 03 एप्रिल (हिं.स.)।गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संदेश देत येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या संदेशांमध्ये प्रेम, करुणा, क्षमा आणि सद्भाव या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाह
गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी देशवासीयांना प्रेम, करुणा आणि बंधुत्व स्वीकारण्याचे आवाहन


नवी दिल्ली , 03 एप्रिल (हिं.स.)।गुड फ्रायडेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना संदेश देत येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाची आठवण करून दिली. त्यांनी आपल्या संदेशांमध्ये प्रेम, करुणा, क्षमा आणि सद्भाव या मूल्यांचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुड फ्रायडेच्या निमित्ताने देशवासीयांना संदेश दिला. आपल्या संदेशात त्यांनी म्हटले की, हा दिवस येशू ख्रिस्त यांच्या बलिदानाची आठवण करून देतो आणि त्यांच्या शिकवणुकीनुसार जीवन जगण्याची प्रेरणा देतो. पंतप्रधान म्हणाले की, गुड फ्रायडे आपल्याला सद्भाव, करुणा आणि क्षमा यांसारख्या मूल्यांना अधिक दृढपणे आत्मसात करण्याची संधी देतो. बंधुता आणि आशा या मूल्यांनी आपणा सर्वांना मार्गदर्शन मिळो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande