
नाशिक, 03 एप्रिल, (हिं.स.) - अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलमध्ये चक्कर येणे, तोल जाणे आणि संतुलनाशी संबंधित समस्यांवर अचूक निदान व उपचारासाठी विशेष 'व्हर्टिगो क्लिनिक' सुरू करण्यात आले आहे. हे क्लिनिक दरबुधवारी कार्यरत राहणार असून, न्यूरोलॉजी आणि कान-नाक-घसा तज्ज्ञांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली रुग्णांचे उपचार करण्यात येणार आहेत.
या क्लिनिकचे नेतृत्व न्यूरोलॉजिस्ट डॉ. विशाल सावळे पाटील, न्यूरोलॉजिस्ट डॉ. प्राची पवार आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. पंकज भट करणार आहेत. यावेळी डॉ. विशाल पाटील यांनी 'व्हर्टिगो' ही अनेक कारणांनी उद्भवणारी समस्या असून, तिचे योग्य निदान करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तर, अनेकवेळा रुग्णांना चक्कर येणे ही सामान्य समस्या वाटते; परंतु त्यामागे गंभीर न्यूरोलॉजिकल कारणे असू शकतात. वेळेवर तपासणी आणि उपचार केल्यास या समस्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते, असे डॉ. प्राची पवार म्हणाल्या.
डॉ. पंकज भट यांनी 'व्हर्टिंगो'च्या अनेक केसेसमध्ये कानातील संतुलन यंत्रणेचा संबंध 'असतो. 'ईएनटी' तपासणी, योग्य चाचण्या आणि विशिष्ट थेरपीद्वारे रुग्णांना जलद आराम मिळू शकतो, असे सांगितले. तर, रुग्णांना विशेष आणि तज्ज्ञ उपचार सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा आमचा उद्देश असल्याचे हॉस्पिटलचे केंद्र प्रमुख अनुप त्रिपाठी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV