उ.प्रदेश निवडणुकीपूर्वी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा डाव, गुप्तचर यंत्रणांचा इशारा
नवी दिल्ली , 30 एप्रिल (हिं.स.)भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मते, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या हल्ल्याचा कट रचत आहे आणि त्यासाठी विविध धोकादायक डाव आखत आहे.गुप्तचर अधिकाऱ्यांचे
उ.प्रदेश निवडणुकीपूर्वी पाकिस्तानकडून मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा डाव, गुप्तचर यंत्रणांचा इशारा


नवी दिल्ली , 30 एप्रिल (हिं.स.)भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या मते, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय उत्तर प्रदेशात पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वी मोठ्या हल्ल्याचा कट रचत आहे आणि त्यासाठी विविध धोकादायक डाव आखत आहे.गुप्तचर अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, या हल्ल्यापूर्वी आयएसआय भारतीय तपास यंत्रणांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असून त्यासाठी प्रचार (प्रोपेगेंडा) मोहिम राबवली जात आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका हा मोठा कार्यक्रम असून त्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली जात आहे.या अंतर्गत आयएसआय समर्थित लोक देशातील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे आणि गुप्तहेरगिरीसारख्या हालचालींमध्ये सहभागी आहेत. यामागचा उद्देश संवेदनशील ठिकाणांची माहिती गोळा करणे हा आहे. इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्यानुसार, या हालचालींमध्ये अचानक झालेली वाढ ही भारतीय यंत्रणांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न आहे, ज्यामुळे मोठा हल्ला करणे सोपे होईल. अधिकाऱ्यांनी अशीही शक्यता व्यक्त केली आहे की आयएसआय देशातील सांप्रदायिक सलोखा बिघडवण्याचाही प्रयत्न करत आहे. अनेक इंटरसेप्ट्समधून असे संकेत मिळाले आहेत की प्रचार माध्यमांचा वापर करून सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

एका अन्य अधिकाऱ्याने सांगितले की आयएसआयचे लक्ष्य केवळ मोठी शहरे नसून लहान शहरे आणि गावेदेखील आहेत, जेणेकरून यंत्रणांना गोंधळात टाकून अचानक हल्ला करता येईल. अलीकडेच गाझियाबाद पोलिसांनी अशा एका मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता, जे रेल्वे स्थानके आणि इतर संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवत होते. हे सौरऊर्जेवर चालणारे कॅमेरे पाकिस्तानस्थित हँडलर्सना थेट (लाइव्ह) फीड देण्यासाठी वापरले जात होते. त्यानंतर देशभरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे ऑडिट सुरू करण्यात आले आहे. यंत्रणांना अशी शंका आहे की अशा प्रकारचे कॅमेरे मोठ्या प्रमाणात आधीच उपलब्ध करून ठेवले गेले आहेत आणि निवडणुकांपूर्वी रस्त्याच्या कडेला असलेल्या ढाबे व दुकानांवर बसवले जाऊ शकतात, ज्यामुळे प्रचारादरम्यान मोठ्या नेत्यांच्या हालचालींवर नजर ठेवता येईल.

अधिकाऱ्यांच्या मते, आयएसआय यावेळी उत्तर प्रदेशातील लोकांऐवजी इतर राज्यांतील लोकांचा वापर हल्ल्यांसाठी करू शकते, जेणेकरून स्थानिक पोलिसांना संशय येणार नाही. विविध राज्यांमध्ये गुप्तहेरगिरी आणि दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आले असले तरी सतत सतर्क राहणे आवश्यक असल्याचे यंत्रणांचे मत आहे, कारण लक्ष विचलित करण्यामागे मोठी साजिश दडलेली असू शकते.

तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आयएसआयची रणनीती भारतातील हल्ले देशांतर्गत असल्याचे दाखवण्याची आहे, जेणेकरून पाकिस्तानवर थेट आरोप येऊ नयेत. दहशतवादाला आर्थिक मदत (टेरर फंडिंग) या मुद्द्यावर पाकिस्तान आधीच एफएटीएफ (फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स) च्या निरीक्षणाखाली आहे. आयएसआयवर पूर्वीपासूनच अमली पदार्थांची तस्करी आणि दहशतवादी कारवायांना पाठबळ देण्याचे आरोप होत आले आहेत. त्यामुळे निर्बंध टाळण्यासाठी आयएसआय प्रत्येक हल्ला स्थानिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करेल.भारतानेदेखील आपली रणनीती अधिक आक्रमक करत प्रत्येक दहशतवादी हल्ल्याला युद्धासमान मानण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर आयएसआयने आपल्या धोरणात बदल केल्याचे मानले जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande