राजधानीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन
नवी दिल्ली, 30 एप्रिल, (हिं.स.) - थोर समाजसुधारक, ''ग्रामगीते''चे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथ
नवी दिल्ली


नवी दिल्ली, 30 एप्रिल, (हिं.स.) - थोर समाजसुधारक, 'ग्रामगीते'चे प्रणेते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना अभिवादन करण्यात आले. कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर विमला यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी विशेष आयुक्त श्वेता सिंघल, सहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, निवासी उपअभियंता जमुनाप्रसाद गंगवार आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

याप्रसंगी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी 'ग्रामगीते'च्या माध्यमातून मांडलेले ग्रामविकासाचे विचार, व्यसनमुक्तीसाठी दिलेला संदेश आणि समाजातील अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेल्या अतुलनीय योगदानाचा परिचय करून दिला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande