सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या १७ कंत्राटदारांना नोटिसा
नियम धाब्यावर बसविले तर होणार ब्लॅकलिस्ट, महापौरांच्या पाहणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.) - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षा आणि नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आ
Notices issued to 17 contractors


नियम धाब्यावर बसविले तर होणार ब्लॅकलिस्ट, महापौरांच्या पाहणीनंतर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.) - सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या ठिकाणी सुरक्षा आणि नियोजनाचा पुरता बोजवारा उडाला असल्याचे समोर आले आहे. वारंवार सूचना देऊनही सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या १७ बड्या मक्तेदारांना महापालिकेने नोटिसा बजावल्या आहेत . यामध्ये आर्थिक दंडासह थेट त्यांना काळ्या यादीत टाकण्याची तंबी पालिका प्रशासनाने दिली आहे. महापौरांच्या दौऱ्यानंतर हे कारवाईचे चाक फिरले आहे. मंगळवारी (दि.२८) महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी शहरात सुरू असलेल्या रस्ते, पूल आणि विविध विकासकामांची संयुक्त पाहणी केली. या पाहणीत कामाच्या ठिकाणी भीषण वास्तव समोर आले. अनेक ठिकाणी योग्य बॅरिकेटिंग नाही, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था शून्य आहे, तर उघडे खड्डे आणि चेंबर्स मृत्यूला निमंत्रण देत असल्याचे दिसून आले. यावर महापौरांनी तीव्र संताप व्यक्त करत कडक कारवाईचे आदेश दिले होते.

जनतेचा जीव धोक्यात, मक्तेदार मात्र सुस्तमहापालिकेने नोटिशीत स्पष्ट केले आहे की, कामाच्या ठिकाणी कामगारांना पीपीई किट उपलब्ध नाहीत आणि वाहतुकीचे कसलेही नियोजन नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी व्हॉट्सॲप, बैठका आणि पत्रांद्वारे अनेकदा सूचना देऊनही कंत्राटदारांनी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. उच्च न्यायालयाच्या जनहित याचिका ७१/२०१३ मधील निर्देशांचेही हे सरळ उल्लंघन असून, एखादी दुर्घटना घडल्यास सर्वस्वी जबाबदारी मक्तेदाराचीच राहणार असल्याचे प्रशासनाने ठणकावून सांगितले आहे.

या मक्तेदारांवर टांगती तलवार

स्वस्तिक इन्फ्रालॉजिक्स, बीटकॉन इंडिया, बी.डी. सोरटिया, आनंद कन्स्ट्रुवेल, एस.बी.डी. इन्फ्राटेक, एम.टी. पाटील बिल्डर्स, महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन, टी ॲन्ड टी इन्फ्रा, पवार पाटकर कन्स्ट्रक्शन, आणि आर.ई. इन्फ्रा यांसह १७ कंत्राटदारांचा यामध्ये समावेश आहे .

- मक्तेदारावर अपात्रतेची कारवाई करणार सुरक्षेच्या अटींचे उल्लंघन हा केवळ प्रशासकीय दोष नसून निविदा अटींचा भंग आहे. आता केवळ दंड करून थांबणार नाही, तर काम बंद पाडणे किंवा मक्तेदाराला अपात्र ठरवण्यापर्यंतची कारवाई केली जाईल.- संजय अग्रवाल, शहर अभियंता, मनपा

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande