लखनऊच्या चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात टळला
लखनऊ, 30 एप्रिल (हिं.स.) । लखनऊच्या अमाउसी येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला.लखनऊहून रायपूरला जाणारे विमान उड्डाण घेणार होते, तेव्हाच धावपट्टीवर एक माकड दिसले. वैमानिकाने आपत्कालीन ब्रेक लावून विमानातील १३२ प्रवाशांवर
इंडिगो विमान संग्रहित फोटो


लखनऊ, 30 एप्रिल (हिं.स.) । लखनऊच्या अमाउसी येथील चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक मोठा अपघात टळला.लखनऊहून रायपूरला जाणारे विमान उड्डाण घेणार होते, तेव्हाच धावपट्टीवर एक माकड दिसले. वैमानिकाने आपत्कालीन ब्रेक लावून विमानातील १३२ प्रवाशांवरील धोका टाळला. चौधरी चरण सिंग आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपट्टीवरून उड्डाण करण्याच्या तयारीत असलेल्या विमानासमोर अचानक एक माकड आले. वैमानिकाने अत्यंत तत्परतेने आपत्कालीन ब्रेक लावले, ज्यामुळे विमानातील १३२ प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली.

नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाला (डीजीसीए) लखनऊ विमानतळावरील विमान अपघाताची माहिती देण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी केली जाईल. लखनऊहून रायपूरला जाणारे इंडिगोचे विमान क्रमांक 6ई 6521 गुरुवारी सकाळी ८:५५ वाजता सुटणार होते.विमानाने धावपट्टीवर लक्षणीय वेग गाठला होता. त्याचवेळी, वैमानिकाच्या लक्षात आले की त्याच्या समोर एक माकड बसले आहे. जर त्याने आपत्कालीन ब्रेक लावले नसते, तर विमानाच्या थ्रस्ट जेट्सनी त्याला आत खेचले असते, ज्यामुळे इंजिनला आग लागण्याचा धोका होता. विमानांच्या पंखांशी टक्कर झाल्यास मोठे नुकसान होऊ शकले असते. आता, ते माकड विमानतळाच्या धावपट्टीपर्यंत पोहोचलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे


 rajesh pande