सोलापूर - जुना बोरामणी नाका परिसरातील अतिक्रमण हटवले; अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा
सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका परिसरात रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून तातडीची कारवाई करत अतिक्रमण हटविण्यात आले. या मोह
सोलापूर - जुना बोरामणी नाका परिसरातील अतिक्रमण हटवले; अपघातांना आळा बसण्याची अपेक्षा


सोलापूर, 30 एप्रिल (हिं.स.)। सोलापूर शहरातील जुना बोरामणी नाका परिसरात रस्त्याच्या कडेला झालेल्या अतिक्रमणामुळे वारंवार अपघात घडत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाकडून तातडीची कारवाई करत अतिक्रमण हटविण्यात आले.

या मोहिमेत रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेली पाच पत्र्यांची शेड, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक व बोर्ड जागेवरच निष्कासित करण्यात आले. अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला होता, त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः वर्दळीच्या वेळेत अपघातांची शक्यता वाढली होती.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून, यामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल आणि अपघातांचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. प्रशासनाने पुढील काळातही अशा अतिक्रमणांवर नियमित कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande