
नाशिक, 30 एप्रिल (हिं.स.)।
- महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती निवडणुकीमध्ये पाच प्रभाग समिती सभापती पदी भाजपाचे तर नाशिकरोड प्रभाग समिती सभापती पदासाठी शिंदे सेनेचे धोंगडे बिनविरोध निवडून आले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती सभापती पदासाठी गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयामध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. अप्पर आयुक्त अजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक प्रक्रिया झाली यावेळी प्रभारी नगरसचिव संजय नेरकर तसेच इतर नगरसचिव विभागाचे कर्मचारी हे त्यांना मदतीसाठी होते.
महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर चार वर्षांनी प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुका होत आहे महापौर पद हे भाजपला दिल्यानंतर मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेला उपमहापौर पद देण्यात आले तर दुसरा मित्र पक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला काहीही मिळाले नाही त्यांना स्थायी समिती मिळण्याची शक्यता असताना त्या ठिकाणी देखील भाजपने आपला दावा सांगितला आणि साई समिती सभापती पदे ही भाजपाने आपल्याकडे कायम ठेवले हे सर्व होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये झुकते माप दिले जाईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. पण तो देखील अंदाज भाजपाने आपल्या बहुमताच्या जोरावर ती चुकीचा ठरविला.
गुरुवारी झालेल्या प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये नाशिक पूर्व या प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या मंगला ननावरे व काँग्रेसचे अख्तार जावेद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले होते. पण प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी ज्यावेळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि माघारी साठी वेळ देण्यात आल्या त्यावेळी काँग्रेसचे जावेद यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे ज्या ठिकाणी भाजपच्या मंगला ननावरे यांची बिनविरोध सभापती पदी निवड झाली तर नाशिक पश्चिम प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपाचे सुरेश पाटील पंचवटी प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपच्या रोहिणी पिंगळे सातपूर प्रभाग समिती सभापती पदासाठी भाजपाचे समाधान देवरे आणि सिडको म्हणजेच नवीन नाशिक प्रभाग समिती सभापती पदासाठी बाळकृष्ण शिरसाट यांचें एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेले होते त्यामुळे या प्रभागात समिती सभापती पदासाठी त्यांची बिनविरोध निवड झाली.
प्रभाग समिती सभापती पदासाठी शिवसेना चिंदे गट आणि शिवसेना उबाठा यांच्यामध्ये रस्सीखेच होती पण शेवटी उबाठा ने माघारी घेतल्यानंतर शिवसेना शिंदे पक्षाचे रमेश धोंगडे बिनविरोध निवडून आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV