
रत्नागिरी, 7 एप्रिल, (हिं. स.) : भाजपच्या ४६व्या स्थापना दिनानिमित्त चिपळूण शहर मंडळातर्फे रामतीर्थ स्मशानभूमीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान सुमारे चार ट्रॅक्टर कचरा हटवण्यात आला. तसेच संपूर्ण परिसर धुऊन स्वच्छ करण्यात आला.
सकाळी ७ ते ९.३० या वेळेत झालेल्या या उपक्रमात पालापाचोळा, हार, गवत, बाटल्या आणि इतर कचरा साफ करून डिटर्जंट व फिनेलच्या साह्याने परिसर निर्जंतुक करण्यात आला. यावेळी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणांनी परिसर दुमदुमला.
या स्वच्छता मोहिमेत शहर मंडळ अध्यक्ष शशिकांत मोदी, जिल्हा सरचिटणीस स्वानंद रानडे, आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेविका वैशाली निमकर, संदीप भिसे, शीतल रानडे, सरचिटणीस सारिका भावे तसेच अभय चितळे, मधुकर निमकर, नरेंद्र बेलवलकर, स्वाती देवळेकर, निखिल किल्लेकर, विलास चव्हाण, महेश दीक्षित, अमोल तटकरे, कुणाल आंबेकर, प्राजक्ता टाकळे, श्रीमती जोशी आणि अभिषेक जागुष्टे आदी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी