महापुरुषांचे बेकायदेशीर पुतळे बसविण्याची मोहीम; घटनांमागे राज्यातील मोठी शक्ती - जयकुमार गोरे
सोलापूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। गावांमध्ये रात्रीत महापुरुषांचे बेकायदेशीर पुतळे बसविण्याची मोहीम काही लोक जाणीवपूर्वक चालवत आहेत. त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खूप मोठा प्लॅन आहे. खूप मोठी टीम यावर काम करत आहे. या घटन
Jaykumar gore newss


सोलापूर, 07 एप्रिल, (हिं.स.)। गावांमध्ये रात्रीत महापुरुषांचे बेकायदेशीर पुतळे बसविण्याची मोहीम काही लोक जाणीवपूर्वक चालवत आहेत. त्यातून सामाजिक अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खूप मोठा प्लॅन आहे. खूप मोठी टीम यावर काम करत आहे. या घटनांमागे राज्यातील मोठी शक्ती असल्याचेही पोलिस तपासात समोर आले आहे. त्यांची खूप मोठी टीम आहे, अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.

सोशल मीडिया चालविणारी वेगळी टीम व पुतळे बनविणारी वेगळी टीम आहे. या सगळ्या गोष्टी पोलिस तपासात समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने काही लोकांना अटक झाली आहे; काही लोकांना अटक करणे बाकी आहे. काही लोक पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती पालकमंत्री गोरे यांनी यावेळी दिली.विविध बैठकांनिमित्त पालकमंत्री गोरे आज सोलापुरात आले होते. नियोजन भवनात झाले. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल उपस्थित होते.

पालकमंत्री गोरे म्हणाले, या कृत्यात सहभागी असलेल्या कोणालाही सोडले जाणार नाही. जर कोणताही अधिकारी या घटनांकडे, अशा लोकांकडे दुर्लक्ष करत असतील तर त्यांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल. अशा घटना टाळण्यासंदर्भात काही निर्णय राज्य पातळीवरूनही होण्याची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा प्रकरणांचा बारकाईने अभ्यास करत आहेत. या प्रकरणांची माहितीही घेत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande