सोलापूर : मुदत संपलेल्या गाळ्यांचा थेट लिलाव करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.) : महापालिकेचे मुदत संपलेले गाळे आणि गाळ्यांमध्ये झालेल्या बेकायदा हस्तांतरण व्यवहारांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांचा थेट लिलाव करण्याचे आदेश त्यांनी दिले. गाळ्यांतील बेका
smc


सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.) : महापालिकेचे मुदत संपलेले गाळे आणि गाळ्यांमध्ये झालेल्या बेकायदा हस्तांतरण व्यवहारांवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. मुदत संपलेल्या गाळ्यांचा थेट लिलाव करण्याचे आदेश त्यांनी दिले. गाळ्यांतील बेकायदा पोटभाडेकरूंना नियमित करण्याचा प्रस्ताव पुढे रेटण्याच्या प्रकारावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे पोटभाडेकरूंना कायदेशीर करण्याचा डावही उधळला गेला आहे.

अनेक ठिकाणी मूळ गाळेधारकांनी महापालिकेला अंधारात ठेवून परस्पर हस्तांतरण व पोटभाडेकरू ठेवून नियमबाह्य व्यवहार केल्याचे समोर आले आहे. या पोटभाडेकरूंना अधिकृत ताबा देण्यासाठी हस्तांतरण प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव काही पदाधिकाऱ्यांनी पुढे रेटला होता. मात्र, या प्रक्रियेमुळे बेकायदा व्यवहारांना वैधता मिळण्याची शक्यता होती.महापालिकेच्या एकूण १३८२ गाळ्यांची मुदत २०१० मध्ये संपली आहे. नियमानुसार मुदत संपल्यानंतर हे गाळे ताब्यात घेऊन पारदर्शक पद्धतीने लिलावाद्वारे नव्याने वाटप करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न करता काही गाळेधारकांनी पोटभाडेकरूंमार्फत लाखो रुपयांची कमाई केल्याचे समोर आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande