
परभणी, 07 एप्रिल (हिं.स.) : परभणी ते जिंतूर महामार्गावर झरीजवळ झालेल्या धडकेत मोटारसायकलवरील दोघा बहिण-भावाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी दुपारी घडली.
एम.एच.38 टी. 2231 क्रमांकाच्या मोटारसायकलवर सेनगाव तालुक्यातील वटकळी येथील राम महादेव व्यवहारे व शितल महादेव व्यवहारे हे बहिण-भाऊ परभणीहून जिंतूरकडे निघाले होते. त्यावेळी जिंतूरहून झरीकडे येणाऱ्या एच.आर.26 डी.एफ. 7890 क्रमांकाच्या कारच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.
या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, आणि परिसरात दु:खाचे वातावरण पसरले आहे. स्थानिक पोलिस घटनास्थळी पोहोचून तपास सुरु केला आहे.
-----------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis