सोलापूर - शिवसेना जिल्हाध्यक्षपदावरून अजय दासरी यांना हटविले
सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून प्रा. डॉ. अजय दासरी यांना हटविण्यात आले आहे. दासरी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गत दोन वर्षात अनेकदा दासरी यांच्या कार्यपद
Jdn


सोलापूर, 07 एप्रिल (हिं.स.)। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदावरून प्रा. डॉ. अजय दासरी यांना हटविण्यात आले आहे.

दासरी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. गत दोन वर्षात अनेकदा दासरी यांच्या कार्यपद्धतीवरून

अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतले होते. ऐन महापालिका निवडणुकीदरम्यानदेखील दासरी यांच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर पक्ष नेतृत्वाकडून मंगळवारी दासरी यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्यात आले आहे.

या संदर्भात खुद्द दासरी यांनीच प्रसारमाध्यमांना कळविले आहे. त्यांनी म्हटले आहे की, या दोन वर्ष,पाच महिने आणि सात दिवसाच्या या प्रवासात उद्धव ठाकरे साहेबांनी दिलेला प्रत्येक आदेश मी शब्दशः पाळला. कोणतीही अपेक्षा न ठेवता, तन-मन-धन अर्पण करून, दिवस-रात्र एक करून पक्ष वाढीसाठी काम केले.मनपा निवडणुकीत हाराकिरी झाली, तरीही आपल्याच लोकांचे घाव सहन करीत,मोजक्या निष्ठावंत सैनिकांना सोबत घेवून निकराने लढा दिला.

सोलापूरमध्ये शिवसेना मजबूत करण्यासाठी मी पूर्ण ताकद लावली. जे शिवसैनिक काही पदाधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळे किंवा परिस्थितीमुळे बाजूला गेले होते, त्यांना पुन्हा प्रवाहात आणले.

या प्रसिद्धीपत्रकात अजय दासरी यांनी आरोप केला आहे की, सोलापूर शिवसेनेला नेहमीच चुकीच्या संपर्कनेते व संपर्कप्रमुखांचा अनुभव आला. यंदाही तेच पुन्हा घडले. ज्या लोकांमुळे पक्ष वाढत नव्हता, शिवसैनिक दूर जात होते, जे कालच्या निवडणुकीत पक्ष सोडले, त्यांच्यासोबत उघडपणे व छुपा कमळाबाई आणि मिंधेचा प्रचार केला,पक्ष विकले, त्यांनाच पुन्हा महत्त्वाच्या पदांवर बसवण्यात आले.

ही चूक माझ्या साहेबांची नाही, माझ्या पक्षाची नाही. पण काही व्यक्तींच्या चुकीच्या निर्णयांमुळे पक्षाची प्रतिमा आणि साहेबांचं नाव मात्र नकळत खराब झाले, ही खंत मनात कायम राहील.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande