खुल्या प्रवर्गातील जातींच्या उन्नतीसाठी 'अमृत'तर्फे परिवार सर्वेक्षण
छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या ''महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी'' (अमृत) च्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रा
खुल्या प्रवर्गातील जातींच्या उन्नतीसाठी 'अमृत'तर्फे परिवार सर्वेक्षण


छत्रपती संभाजीनगर, 08 एप्रिल (हिं.स.)।

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या 'महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी' (अमृत) च्या वतीने खुल्या प्रवर्गातील लक्षित गटाच्या सर्वांगीण विकासासाठी २५ एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात 'परिवार सर्वेक्षण अभियान' राबविण्यात येणार आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून कुटुंबांची सद्यस्थिती जाणून घेऊन नवीन कल्याणकारी योजना तयार केल्या जाणार आहेत.

खुल्या प्रवर्गातील २५ जाती साठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी स्वतंत्र शासकीय विभाग उपलब्ध नसल्याने, अमृत संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. या सर्वेक्षणात २५ जातींचा समावेश आहे, ब्राह्मण, सिंधी, हिंदू मारवाडी, गुजराती, पटेल, राजपूत, राजपुरोहित, हिंदू नेपाळी, बनिया, कम्मा, कायस्थ, अय्यंगार, नायर, नायडू, पाटीदार, बंगाली, भूमिहार, येलमार, ठाकूर, त्यागी, सेनगूनथर, जाट,आणि कोमटी/वैश्य. इत्यादीचा समावेश आहे.

लक्षित गटातील नेमकी लोकसंख्या आणि त्यांची आर्थिक स्थिती तपासणे, युवकांच्या व कुटुंबांच्या गरजा आणि शासनाकडून असलेल्या अपेक्षांचा अभ्यास, उपलब्ध स्थानिक संसाधने आणि कौशल्यानुसार रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करणे सर्वेक्षणाचा उपयोग होणार आहे.

अमृत मार्फत राबवल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक अर्थसाहाय्य आणि स्पर्धा परीक्षा प्रोत्साहन अशा योजनांची माहिती घराघरांत पोचवली जाणार आहेत.

सर्वेक्षण महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी राबवले जाणार आहे. या काळात अमृतचे प्रतिनिधी थेट कुटुंबांशी संपर्क साधतील. तसेच, सामाजिक संस्था, संघटना आणि मंडळांकडूनही माहिती संकलित केली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक अक्षय लांबे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. लक्षित गटातील जास्तीत जास्त कुटुंबांनी अमृतच्या प्रतिनिधींना सहकार्य करून आपली माहिती नोंदवावी आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा.

तसेच विभागीय व जिल्हा कार्यालय - अमृत, पुंडलिक नगर रोड, सेक्टर-४ सिडको, हनुमाननगर, पाण्याचे टाकीजवळ,

छत्रपती संभाजीनगरयेथे संपर्क साधावा. असे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande