राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर
मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेत विविध
राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ : अंतिम निकाल जाहीर


मुंबई, 08 एप्रिल (हिं.स.)

: महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २७ ते २९ मे २०२५ दरम्यान घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२४ चा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला असून तो आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या परीक्षेत विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे.

या परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्ग गटातून राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील आरती परमेश्वर जाधव या महिलां खुल्या प्रवर्गामधून राज्यात प्रथम आल्या आहेत.

उमेदवारांचा सविस्तर निकाल तसेच प्रत्येक प्रवर्गासाठीचे सीमांकन गुण आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले असल्याचे आयोगाने स्पष्ट आहे.

वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच हा निकाल न्यायालयीन प्रकरणांतील अंतिम निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आला आहे.

आरक्षित प्रवर्गांतील उमेदवारांची शिफारस सक्षम प्राधिकरणाकडून पडताळणीच्या अधीन राहून करण्यात येणार असल्याचेही आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande