लातूर - कासार सिरसी गुन्ह्याचा तपास वेगात; आणखी दोन आरोपी अटकेत
लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)। : कासार सिरसी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून, आणखी दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार
पोलीस कारवाई


लातूर, 08 एप्रिल (हिं.स.)।

: कासार सिरसी पोलीस ठाण्यात दाखल गंभीर गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले असून, आणखी दोन फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली होती.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गु.र.नं. 55/2026 अन्वये दाखल असलेल्या या प्रकरणाचा तपास अत्यंत बारकाईने व तांत्रिक पद्धतीने सुरू होता. अमोल तांबे व मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधार बावकर यांनी विशेष पथक तयार करून फरार आरोपींचा शोध सुरू ठेवला होता.

सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने उमरगा येथे गुप्त माहितीच्या आधारे शोध मोहीम राबवली. उमरगा-आळंद रोडवरील भुसणी टी-पॉईंट परिसरात सापळा रचून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :

1. संजयसिंग अमरसिंग राठोड उर्फ राजपूत (रा. चोसला, राजस्थान)

2. रेवण उर्फ रोहन उर्फ बंटी बिरु सोनटक्के (रा. मुरुम, ता. उमरगा, जि. धाराशिव, सध्या रा. दिघी, पुणे)

चौकशीदरम्यान आरोपींनी इतर साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा क्रिस्टा कार लातूर शहरातून चोरी केल्याचेही उघड झाले. हीच कार विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वाहन चोरी प्रकरणातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या कारवाईमुळे गुन्ह्यातील संपूर्ण टोळी उघडकीस येण्याची शक्यता असून, तपास अधिक मजबूत झाला आहे. अटक आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कासार सिरसी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून, इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक सुधार बावकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक सदानंद भुजबळ व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande