युद्धविरामाच्या घोषणेनंतर सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ
जळगाव, 08 एप्रिल (हिं.स.) | मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी चढ-उतार सुरु आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आता इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर जागति
gold and silver


जळगाव, 08 एप्रिल (हिं.स.) | मागच्या काही दिवसापासून सोने आणि चांदी दरात मोठी चढ-उतार सुरु आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे दोन्ही धातूंच्या दरात घसरण दिसून आली. मात्र आता इराण आणि अमेरिका यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीची घोषणा झाल्यानंतर जागतिक बाजारात मोठी हालचाल दिसून आली आहे. या घडामोडींचा थेट परिणाम भारतातील सराफा बाजारावर झाला असून आज बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ नोंदवली गेली आहे.

या घडामोडींचा थेट परिणाम जळगावच्या सराफा बाजारावर दिसून आला असून सोनं आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. बुधवारी सकाळी बाजार उघडताच सोन्याच्या दरात सुमारे 3 हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली, तर चांदीच्या दरातही 10 हजार रुपयांची वाढ झाली आहे.सध्या जळगाव बाजारात जीएसटीसह सोन्याचा दर सुमारे 1 लाख 56 हजार 45 रुपयांवर पोहोचला आहे, तर चांदीचा दर 2 लाख 54 हजार 410 रुपयांपर्यंत गेला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande